maratha samaj stopped ranjit baban shinde entering village saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : पंढरपुरात आमदार पुत्राच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या रणजित शिंदे यांना रोखले

मराठा समाजाच्या तरुणांनी माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना गावात येण्यापासून राेखलं.

भारत नागणे

Pandharpur :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या एका आमदार पुत्राला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.  (Maharashtra News)

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील मराठा समाजाच्या तरुणांनी माढ्यचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना येथील मराठा समाजाच्या तरूणांनी जाब विचारत गाव बंदी असताना तुम्ही गावात आलाच कसं असा संतप्त सवाल उपस्थित केला. तरूणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्राला विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन न करताच माघारी फिरावे लागले आहे.

तुंगत येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यासाठी आमदार पुत्र रणजित शिंदे (ranjit shinde), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे (samadhan kale) आपल्या कार्यकर्त्यांसह गावात येताच मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना गावच्या वेशीवर आडवून राजकीय नेत्यांना गाव बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे असा प्रश्न करत रोखण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रणजित शिंदे यांचा मागील काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संदर्भात एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्यावेळी शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आज पुन्हा शिंदे यांना विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यापासून रोखण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT