Maratha Reservation Updates Manoj Jarange clears his stand after meeting with raj thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: कोर्टातील आरक्षणाचा मुद्दा नाही, आमच्या मागण्या वेगळ्या; मनोज जरांगेंनी उलगडून सांगितलं

Satish Daud

Manoj Jarange on Maratha Reservation:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट घेती. यावेळी त्यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेलं मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारपरिषद घेत कोर्टातील आरक्षणाचा आमचा मुद्दा नाही, आमच्या मागण्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, असं म्हणत आरक्षणाचं गणित समजावून सांगितलं. (Latest Marathi News)

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत आमची चर्चा झाली. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेलं मराठा आरक्षण मिळू शकत नाही, असा राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. पण आमची मागणी कोर्टातील आरक्षणाबाबत नाही. पूर्वी आम्हाला आरक्षण होतं त्यासाठी हा लढा आहे. जेव्हा आम्ही कुठल्या आरक्षणाबाबत बोलतो आहोत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सकारात्मक झाले, असं मनोज जरांगे यांनी माध्यमांना सांगितलं.

"मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं"

राज ठाकरेंच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, हे आरक्षण मिळू शकत नाही. ते तुम्हाला झुलवत ठेवतील. पण आमचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रतील मराठा यांचा मूळ व्यवसाय शेती हा आहे. त्यामुळं राज्यातील सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे, अशी भूमिकाही जरांगे यांनी मांडली.

"जालन्यात कुणबींचे जुने पुरावे सापडले"

जालन्यातील काही तालुक्यांत कुणबींचे जुने पुरावे सापडले आहेत. काल गिरीश महाजनं यांनी सांगितलं होतं की, आम्हाला जीआर काढण्यासाठी काही आधार पाहिजे, आज आम्हाला पुरावे मिळाले आहेत. ही बाब आम्ही राज ठाकरेंना सांगितली, त्यानंतर आता आपण तज्ज्ञांकडून यावर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं आम्हाला सांगितलं, अशी माहिती देखील यावेळी मनोज जरांगे यांनी दिली.

"हैदराबादमध्ये असताना आम्हाला आरक्षण होतं"

आम्ही हैदराबाद संस्थानात असताना मराठ्यांना आरक्षण होतं. मराठवाडा एक वर्षानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला. पण पुढे आम्हाला ते आरक्षण लागू केलं गेलं नाही. हे आम्ही राज ठाकरेंना सांगितल्यानंतर त्यांच्या खरा विषय लक्षात आला. आज सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हा विषय क्लिअर होईल, असंही जरांगे म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT