Maratha Reservation Update Today  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! ‘सगेसोयरे’अधिसूचनेवर ४ लाखांहून अधिक हरकती प्राप्त

Maratha Reservation Update Today : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व्हेक्षण केलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Maratha Reservation Update Today:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व्हेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. याच संर्दभात आता ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीत सांगण्यात आलं आहे की, ''सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.'' (Latest Marathi News)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने माहिती दिली आहे की, ''१६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.''

यामध्येच पुढे सांगण्यात आलं आहे की, ''या हरकती व सूचनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग तसेच मध्यवर्ती टपाल नोंदणी शाखा, मंत्रालय, मुंबई या विभागांच्या कार्यालयातील सुमारे 300 हून अधिक अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत 17 फेब्रुवारी ते दि.19 फेब्रुवारी 2024 या सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी कार्यालयात हजर राहून याबाबत प्रक्रिया करण्यात येत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT