Panchaganga River: पंचगंगा प्रदुषणमुक्त होणार! नदीत जाणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटींचा निधी उपलब्ध होणार

Kolhapur News: कोल्हापूर शहरास शुद्ध आणि कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट जलवाहिनी प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
Panchaganga River
Panchaganga RiverSaam Tv

Panchaganga River:

कोल्हापूर शहरास शुद्ध आणि कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट जलवाहिनी प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत उपलब्ध निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

शहीद जवान संभाजी भिमसेन बागडी यांच्या मातोश्रींना पाच एकर शेतजमीन वाटप केलेल्या जमीनीचा सातबारा आणि ८ अ प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्वावर २६ जणांना शासन सेवेत सामावून घेतले असून त्यातील दोघा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Panchaganga River
Rajkumar Santoshi: 'अंदाज अपना अपना'चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

'पंचगंगा प्रदुषणमुक्त होणार'

पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तिरूपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी अंबाबाई व जोतिबा देवस्थानचा आराखडा तयार केला जात आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३२०० कोटी रूपये जागतिक बँकेकडून मंजूर केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध अडचणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असे जाहीर करतानाच कोल्हापूरातून नागपूर- गोवा शक्तीपीठामुळे येत्या काळात दळणवळण यंत्रणा सुधारेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Panchaganga River
Adani Realty : 'अदानी रियल्टी'ची वांद्र्यातील मोक्याच्या जागेसाठी सर्वाधिक बोली; महामंडळाला मिळणार इतक्या हजार कोटींचा महसूल

पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com