Maratha Protesters Surround Supriya Sule  Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: सुप्रिया सुळे मनोज जरांगेंच्या भेटीला, मराठा आंदोलकांनी घातला घेराव

Maratha Protesters Surround Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीदरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांना आझाद मैदानावर घेराव घातला.

Bharat Jadhav

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यावेळी काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची कार अडवली होती.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज, रविवारी भेट घेतली. त्यांच्या तब्येतची विचारपूस केली. तेथून निघताना कारच्या दिशेने जाताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला.

यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना काही प्रश्न विचारले. मराठा आंदोलकांनी त्यांची कार अडवत त्यांना घेराव घातला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढलं. आंदोलकांनी त्यांना बराच वेळ अडवून ठेवलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतची विचारपूस केली. उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती बरी नाही. तरीही त्यांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधला. स्वच्छता, तसेच काही गैरसोयींबाबत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करावी, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगेंशी चर्चा केल्यानंतर त्या उपोषणस्थळावरून निघत असताना काही आंदोलकांनी त्यांना रोखलं.

सर्वपक्षीय बैठक घ्या, एकदिवसीय अधिवेशन बोलवा

सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्यानंतर एकदिवशीय अधिवेशन घेत हा प्रश्न मार्गी लावावा. जर सरकारला करायचे असेल तर त्यांना अवघड नाहीये. कोणत्याच राजकीय पक्षाचा विरोध नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा. त्यात गरज असेल तर कायद्यात बदल करावेत आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसला सोबत घ्या, राज ठाकरेंची इच्छा

लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

खळबळजनक! निवडणुकीआधी महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ, एकाच पत्त्यावर तब्बल २०० जणांची नोंद

Toothpaste Scam Alert : तुम्ही बनावट टूथपेस्ट तर वापरत नाही? कारण आले समोर, वाचा नेमकं प्रकरण काय आहे

SCROLL FOR NEXT