भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी नवा मोठा आरोप केलाय. आपल्याविरोधात ट्रॅप लावल्याचा दावा जरांगेंनी केलाय. लाड यांनी जरांगेंना आमदारकीची ऑफर दिल्यानंतर जरांगेंनी हा आरोप केलाय. त्यामुळे लाड आणि जरांगेंमध्ये नेमकं काय चाललंय आणि जरांगेंविरोधात कुणी ट्रॅप लावलाय त्यावरचा हा रिपोर्ट.
मनोज जरांगेंनी पुन्हा सगे-सोयरे जीआरसाठी उपोषण सुरु करताच भाजप आणि जरांगे आमने-सामने आलेत. त्यातच प्रसाद लाडांनी जरांगेंना विधीमंडळात आपलं मुद्दा मांडण्याचं आवाहन केलं. त्यासाठी आपल्या आमदाकीचा राजीनामा देऊन जरांगेंना आमदार करण्याची ऑफरही दिली. मात्र यामुळे जरांगे आणखीनच भडकले. आपल्याविरोधात ट्रॅप रचत असल्याचा आरोप जरांगेंनी केला.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगेंवर आक्रमक आक्रमक टीका केली होती. त्याला जरांगेंनीही शिवराळ भाषेत उत्तर दिलं होतं. मात्र त्यानंतर प्रसाद लाडांनी सबुरीची भूमिका घेत मनोज जरांगेंचा उल्लेख भाऊ असा केला. मात्र यावरूनच गोड बोलून आंदोलन फोडू नका, भाऊ म्हणून ट्रॅप रचू नका, असा इशाराच जरांगेंनी दिलाय..तर आमदारकीच्या आडून मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय..
मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याविरोधात सापळा रचला जात असल्याचा आरोप केला होता. त्याचा फटका लोकसभेला बसला. आता विधानसभेपूर्वी जरांगेंनी आपल्याविरोधात गोड बोलून ट्रॅप रचला जात असल्याचं म्हटलंय. त्यामुळे जरांगेंच्या आरोपांना भाजप कसं उत्तर देणार? यावर विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.