Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'सरकारकडून फसवणूक, यापुढे १ तासही देणार नाही...' जरांगे पाटलांचा इशारा; मुंबईकरांना केलं खास आवाहन!

Manoj jarange Patil Press Conference: "आमची सगळी तयारी झाली आहे, आम्ही सज्ज आहोत, आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही.. असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २६ डिसेंबर २०२३

Manoj jarange Patil News:

मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मराठा आंदोलक मुंबईमध्ये धडकणार असल्याची घोषणा केली आहे. १० लाख गाड्यांसह ३ कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये धडकणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.. असा इशाराही त्यांनी दिलाय. "आमची सगळी तयारी झाली आहे, आम्ही सज्ज आहोत,आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आम्ही शेतातली काम आटोपून मुंबईला येण्याचे नियोजन केले आहे. मुंबईतील आंदोलन हे सर्वात मोठे असेल. सर्व कामे आटोपून मुंबईत धडक द्यायची आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मुंबईतील लोक आमचीच आहेत, मुंबईतला प्रत्येक माणूस आमचं स्वागत करेल अशी अपेक्षा. त्यांनी आमचे स्वागत करावे..." असे खास आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारला इशारा!

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "सरकारकडून आमची फसवणूक करण्यात आली. आतपर्यंत गेलेल्या बळीला पूर्णतः सरकार जबाबदार आहे, यापुढे सरकारला एक तासही वेळ देणार नाही. लवकर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मराठे तुटून पडल्याशिवाय राहणार नाही..." असे जरांगे पाटील म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुजबळांवर टीका...

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवरही (Chhagan Bhujbal) निशाणा साधला. "भुजबळ फक्तं स्वार्थासाठी राजकारण करतं आहेत. त्यांनी ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचे काम केले. त्यांना गोळ्या चालू करा.. असा टोला जरांगे पाटलांनी लगावला. तसेच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर यांच्याकडे बघतो..." असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. (Latest MarathiNews)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT