Manoj Jarange hits back at Raj Thackeray with “crooked ear” jibe over remarks on Shinde’s role in Maratha reservation protest. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Attacks Raj Thackeray: राज ठाकरे कुचक्या कानाचे,मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Mumbai Traffic Chaos: राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत, असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केलाय.. मात्र मनोज जरांगे राज ठाकरेंवर एवढे का संतापले? ठाकरेंची कोणती गोष्ट जरांगेंच्या जिव्हारी लागलीय?

Omkar Sonawane

ही राज ठाकऱ्या म्हणजे असाय मानाला भुकलेलं पोरगंय... यानंतर आमच्याकडं कुचक्या कानाचं म्हणतेत..कुचक्या कानाचं, मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना कुचक्या कानाचं म्हटलंय... आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेत केलेलं वक्तव्य.

खरंतर ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे आझाद मैदानावर तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत... तर आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून गेलीय... त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत असल्याचा प्रश्न राज ठाकरेंना विचारला... मात्र या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील म्हणत जरांगेंच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे असल्याच्या चर्चांना आणखी हवा दिली आणि जरांगेंना हिच गोष्ट खटकली.. त्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना कुचक्या कानाचा म्हटलंय....

मात्र राज ठाकरेंनी सप्टेंबर 2023 मध्येच अंतरवाली सराटीत जाऊन ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं अशक्य असल्याची भूमिका घेतली होती.. एवढंच नाही तर आरक्षणासाठी आर्थिक निकष हाच मार्ग असल्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती.. त्यावरुन जरांगेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.. आता राज ठाकरेंनी थेट जरांगेंच्या आंदोलनामागे शिंदेंची रसद असल्याचे संकेत दिल्याने जरांगे भडकले आहेत.... त्यामुळं आता जरांगेंच्या खोचक टीकेला राज ठाकरे काय उत्तर देणार? यावर जरांगे विरुद्ध ठाकरे वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

Shocking : चोरीच्या आरोपाखाली गावगुंडांकडून क्रूर शिक्षा, दोन दिवस तरुणाच्या गुप्तांगात...

Maharashtra Live News Update: ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - सुनील तटकरे

Ganesh Festival: गणेशोत्सव मंडळात महिला नाचवल्या, गणेशमूर्तीसमोर अश्लील डान्स ; बघा संतापजनक VIDEO

SCROLL FOR NEXT