Maratha protest leader Manoj Jarange addressing media after alleging disguised policemen infiltrated the agitation. saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

Maratha Reservation Protest: मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी आरोप केला की भगवे रुमाल आणि टोप्या घालून ४०-५० पोलिस आझाद मैदानावरील मराठा आंदोलनात शिरलेत. आंदोलनात शिरलेल्या पोलिसांवर कारवाई करा,अशी मागणी त्यांनी केलीय.

Bharat Jadhav

  • आंदोलनात पोलीस शिरल्याचा गंभीर आरोप केला.

  • ४०-५० पोलिस भगवे रुमाल, टोप्या घालून आंदोलनात घुसले असल्याचे आरोप.

  • जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आंदोलन मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदनावर आंदोलन करत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी गंभीर आरोप केलाय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय.

फडणवीस साहेब वातावरण थंड ठेवा, पोलीस आमच्या गाड्या अडवताहेत. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. अडवणूक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केलीय. आंदोलनात ४० ते ५० पोलिसांनी गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आंदोलनात शिरलेत. आमच्या गाड्या अडवत आहेत असेही जरांगे पाटील म्हणालेत.

पोलीस गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आमच्या गाड्या अडवताहेत. भगवे रुमाल पोलिसांना घालायची वेळ येईल, असं कधी वाटले नव्हते. जर महायुतीपासून मराठा समाज बाजूला गेला तर त्यांचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील येणार नाही. मराठ्यांची सरकारला गरज आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. त्यांना चिचुंदरीची उपमा केलीय. राणे साहेबांना निलेश साहेबांना काही बोललो नाही? नारायण राणे आणि निलेश साहेबांनी त्यांना समजावून सांगावं, नाहीतर त्याला लाल करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय.

अभ्यासकांशी चर्चा केली आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही. सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली आहेत. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतोय. सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो, असेही जरांगे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली

White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Crime: गरोदर गर्लफ्रेंडची हत्या, सीरियल किलर निघाला बॉयफ्रेंड; आरोपीने चौघांचा जीव घेतला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा, परतीच्या प्रवासात गणेशभक्तांचे हाल

Maratha Reservation Row: मराठ्यांनो थोडं थांबा! सरकारने गडबड केलीय; कोणी केला हा सर्वात मोठा दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT