Maratha Reservation Protest Saam Tv
महाराष्ट्र

Beed Curfew: मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, बीडमध्ये संचारबंदी लागू

Maratha Reservation Protest: मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, बीडमध्ये संचारबंदी लागू

विनोद जिरे

Beed Curfew:

एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी याबाबत आदेश जाहीर केले आहेत.

मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी खूप आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी बीडमध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यालय जाळले. याआधी आंदोकानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय जाळले होते. यानंतर अग्निशमन दलाची गाडी देखील जाळली. अशाच अनेक जाळपोळीच्या घटना येथे घडत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही संचारबंदी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये लागू करण्यात आली आहे. याबाबत जाहीर करण्यात आलेल्या आदेशाचे पत्रही समोर आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, 'बीड जिल्ह्यात जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. दिनांक 29.10.2023 च्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. जिल्ह्यात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकान्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत.' (Latest Marathi News)

यात पुढे लिहिलं आहे की, ''आज आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.'

आदेशात पुढे म्हटलं आहे की, 'वेळेअभावी सर्व संबंधीत यांना नोटीस बाजवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, मी दिपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड मला प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT