Maratha Aarakshan: Free Meal Provided in Hotel If Your Name Is Manoj Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'मनोज' नाव असेल तर हॉटेलमध्ये जेवण फुकट; जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: मनोज जरांगेंना समर्थन देण्यासाठी चक्क मनोज नाव असलेल्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News:

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लक्षवेधी लढा उभारला असून त्यांना राज्यभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावांमध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव एकवटत आहेत.

अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेल चालकाने मनोज जरांगेंना समर्थन देण्यासाठी चक्क मनोज नाव असलेल्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या आगळ्या वेगळ्या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव चर्चेत आहे. जरांगे पाटील यांच्या लढ्याला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, रास्ता रोको करत त्यांना समर्थन दिले जात आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेल चालकाने जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पाचोड्यात अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी हा आगळा वेगळा उपक्रम सुरु केला आहे. भोजने यांच्याकडून 'मनोज' नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जात होते. त्यात वाढ करून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. त्यासाठी त्यांना मराठा बांधवांकडून मोठे सहकार्य मिळत आहे. आपल्याकडूनही त्यांना समर्थन भेटावे असा विचार मनात घेऊन बाळासाहेब भोजने यांनी जरांगे यांचे नाव 'मनोज' असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्यास सुरूवात केली आहे.

हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवली आहे. हॉटेल चालकाच्या या आगळ्या वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण निर्णयाची संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात राडा, सारसबागमध्ये दोन गट भिडले; VIDEO व्हायरल

Deepika- Ranveer Daughter: अहाहा! किती गोड दिसतेय, रणवीर आणि दिपिकाची मुलगी, फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

SCROLL FOR NEXT