Maharashtra Politics: अजितदादांसोबत गेलेल्या खासदारांना लवकर अपात्र करा; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Maharashtra Political News: अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना लवकरात लवकर अपात्र करा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Disqualify Ajit Pawar Group MP Sunil Tatkare Supriya Sule letter to Lok Sabha Speaker
Disqualify Ajit Pawar Group MP Sunil Tatkare Supriya Sule letter to Lok Sabha Speakersaam tv
Published On

Supriya Sule letter to Lok Sabha Speaker

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना लवकरात लवकर अपात्र करा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी पत्रात मांडला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Disqualify Ajit Pawar Group MP Sunil Tatkare Supriya Sule letter to Lok Sabha Speaker
Maharashtra Politics: ३१ डिसेंबरला अपात्रतेचा निर्णय लागणार, मग मराठ्यांना आरक्षण..., ठाकरे गटाचा CM शिंदेंना सवाल

सुप्रिया सुळे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही ४ जुलैला २०२३ रोजी याचिका दाखल केली होती. मात्र, चार महिने उलटून देखील यावर कोणतीही झाली नाही. दोषी खासदाराचे कृत्य हे दहाव्या अनुसूचीवरील निंदनीय हल्ला आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने घटना आणि लोकशाही तत्त्वे खर्‍या भावनेने टिकवून ठेवण्यासाठी अशा याचिकांचे वेळीच निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाई होत नसल्याने राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) नमूद करण्यात आली आहे.

घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी पत्रात मांडला आहे. सध्या आमदार अपात्रतेप्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना लवकरात लवकर अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र, लोकसभा अध्यक्षांना लिहलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आता याबाबत काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Disqualify Ajit Pawar Group MP Sunil Tatkare Supriya Sule letter to Lok Sabha Speaker
ST Bus News: मनोज जरांगेंचं उपोषण मागे, राज्यातील एसटी बससेवा पूर्ववत होणार; प्रवाशांचं टेन्शन मिटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com