Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : "त्याने २५ वेळा उपोषण केले, पण...", छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर जहरी टीका

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना भुजबळ म्हणाले, "त्याने आतापर्यंत 25 वेळा उपोषण केले. पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही".

Satish Daud

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही नवा नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघेही एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. अगदी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील शांतता रॅलीत जरांगे यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. छगन भुजबळ 'अपशकुनी' असून ते ज्या पक्षात जातात त्याचे वाटोळे होते, असा टोला जरांगे यांनी हाणला होता.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या टीकेचा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खरपूस समाचार घेतला. नाशिक येथे माध्यमांसोबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "नाशिक येथील शांतता रॅलीत 5 लाख मराठा बांधव येणार, असं काही लोकांनी सांगितले. इतके लोक शहरात आले तर नाशिक बंद पडेल".

पण प्रत्यक्षात 5 लाख नाही तर फक्त 8 हजार लोकच रॅलीत सहभागी झाले होते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. या मोर्चात अनेकजण शिव्या देत होते. काय त्यांची संस्कृती आणि घाणेरडे उच्चार. सुरुवातीला मी शिव्या ऐकल्या त्यानंतर बंद झाल्या.. पण पुन्हा आता दोन महिन्यांपासून शिव्या द्यायला सुरुवात झाली आहे".

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनावर बोलताना भुजबळ म्हणाले, "त्याने आतापर्यंत 25 वेळा उपोषण केले. पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याने जातीवाद करण्यास सुरुवात केली. पण त्याकडे देखील महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष दिले नाही".

दरम्यान, सगेसोयरे अधिसूचना जारी करून मराठा समाजाला तातडीने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अन्यथा 288 जागांवर उमेदवार उभे करुन सत्ताधाऱ्यांना पाडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. या इशाऱ्याचा देखील मंत्री छगन भुजबळ यांनी खरपूस समाचार घेतला.

माध्यमांसोबत बोलताना भुजबळ म्हणाले, "मी तर मागेही म्हणालो की त्यांनी 288 विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करावे. यातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे. म्हणजे त्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडविता येईल. जास्त उमेदवार निवडून आले म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, असा टोलाही भुजबळ यांनी मनोज जरांगेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

Shukra Gochar 2025: 'या' ३ राशींना होणार भलं; नोकरीत बढती आणि व्यवसायत होईल भरभराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची रिमझिम सुरूच! कोकणासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

SCROLL FOR NEXT