Jarange Rane Fadnavis Controversy Saam Tv
महाराष्ट्र

Rane Vs Jarange : 'जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना', राणे-जरांगे वाद पेटला; VIDEO

Narayan Rane Vs Manoj Jarange Patil : राणे आणि जरांगेंमध्ये यांच्यात रंगलेला कलगितुरा काही थांबायला तयार नाही. त्यातच नितेश राणेंनी जरांगेंची तुलना थेट मोहम्मद अली जिनांशी केलीय. त्यामुळे हा वाद आणखीच टोकाला गेलाय.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगेंच्या सर्वाधिक निशाण्यावर आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीसांवरील टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपमधल्या मराठा नेते आणि आमदारांची फौजच आता सज्ज झालीय. यात सर्वात आघाडीवर आहेत ते राणे-पिता पुत्र.

राणे आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेलाय. नारायण राणेंनी थेट जरांगेंच्या कपड्यांवरून टीका केल्यानंतर आता त्यांचा मुलगा नितेश राणेंनी जरांगेंची तुलना थेट पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिना यांच्याशी केलीय. राणे हे फडणवीसांच्या टोळीतले असल्याची टीका जरांगेंनी केली होती.

मराठवाड्यात मनोज जरांगेंचा वाढता प्रभाव लक्षात घेता नारायण राणेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा केली. एवढंच नाही तर जरांगे काय करतात पाहतोच, असं म्हणत राणेंनी जरांगेंना आव्हान दिलं होतं. आता पुन्हा राणेंनी जरांगेंना दाढीवरून डिवचल्यानं वादा आणखीनच टोकाला जाण्याची शक्यात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगेंनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला. जरांगेंच्या टीकेमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता जरांगेंच्या आक्रमक टीकेला उत्तर देण्यासाठी राणे, दरेकर, लाड यांच्यासारखे मराठा नेते पुढे आलेत. मात्र जरांगेंविरोधातील टीकेचा भाजपला फायदा होणार की विधानसभा निवडणूकीत भाजपचा पाय आणखी खोलात जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT