Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Manoj Jarange Health Latest Updates in Marathi Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका; आंदोलनाला गालबोट लावू नका.. जरांगे पाटलांचे मराठा बांधवांना आवाहन

माधव सावरगावे

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधी जीआर काढून कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आज (शुक्रवार, ८ सप्टेंबर) त्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाला कुठेही गालबोट न लावण्याचे आवाहन मराठी बांधवांना केले आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"या आंदोलनाला सर्व मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. पण या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये असे मी आवाहन करतो. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, आत्महत्या करू नये.." असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी केले आहे. तुम्ही जीवन संपवायला लागले तर आरक्षणाचा फायदा उचलणार कोण? असेही ते यावेळी म्हणाले.

सरकारचा निरोप नाही..

आरक्षणासंदर्भात सरकारसोबत चर्चेविषयी बोलताना "चर्चेसाठी आम्ही पिशव्या भरुन तयार आहोत, सरकार जीआरमध्ये बदल करत असेल तर आम्ही दोन पाऊल मागे सरकतो. मात्र सरकारचा निरोपच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

धनगर समाज आक्रमक....

दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे. याच मागणीवरुन धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT