Mangesh Kalokhe : खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार

Khopoli Mangesh Kalokhe Murder CCTV Footage Viral : खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Mangesh Kalokhe : खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार
Khopoli Mangesh Kalokhe Murder CCTV Footage ViralSaam Tv
Published On
Summary
  • सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर खोपोलीत पुन्हा हत्येचा थरार

  • मुलाला शाळेत सोडून परतताना मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या

  • 9 आरोपींना रायगड पोलिसांकडून अटक, 2 नेते फरार

  • CCTV फुटेजमुळे हत्येचा कट उघड

वर्षभरापूर्वी डिसेंबर महिन्यांत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेतील गुन्हेगारांना अद्यापही शिक्षा झाली नसून आरोप सिद्ध करण्यासाठी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षा कोर्टात तारखांवर तारखा वाढत आहेत. ही घटना ताजी असतानाच खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेत आता मोठं वादळं आलं आहे. या घटनेशी संबंधित नऊ आरोपींना पकडण्यात रायगड पोलिसांना यश आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे (Mansi Kalokhe) यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्याला सोडून परत येताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मंगेश काळोखे यांना भर दिवसा रस्त्यात अडवलं आणि खाली पाडलं. रस्त्यावर पडल्यानंतर दोन-तीन जणांनी काळोखेंना घेरले. त्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्याचा वापर करून काळोखे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सुमारे २४ ते २७ वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की काळोखेंचा जागीच मृत्यू झाला.

Mangesh Kalokhe : खोपोलीतील माजी नगरसेवकच्या हत्याकांडातील ९ आरोपी गजाआड; दोघे फरार
Shocking : "मराठी सोडून हिंदीत बोलते..." ६ वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या; निर्दयी आईनेच रचला कट

काळोखेंच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रायगड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत नऊ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

रायगडच्या खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरदिवसा निघृणहत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांच्या हाती लागले असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे फरार आहेत. ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेचा CCTV फुटेज आता समोरआला असून यामुळे पुन्हा एकदा बिडच्या संतोष देशमुख हत्याकांडाची आठवण ताजी झाली. दरम्यान दिवसाढवळ्या हत्या होतात कशा? पोलिसांचा धाक या गुंडांवर राहिलेला नाही का? असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com