Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : CM देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार, पण...; मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले

shivendraraje bhosale on Maratha Reservation : CM देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम असून तिन्ही नेते तोडगा काढत आहेत. याबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले.

ओंकार कदम

मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा, असं शिवेंद्रराजे भोसले यांचं भाष्य

आरक्षण घाईगडबडीत न देता, ते कायदेशीर आणि टिकाऊ असावं, यावर सरकारचा भर

महायुतीचे वरिष्ठ नेते यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करताहेत

सरकार मराठा समाजाच्या भावनांचा आदर करतंय

सातारा : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनीही मुंबईच ठाण मांडलं आहे. मराठा आंदोलकांनी मुंबई जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांना ६ वाजेपर्यंत उपोषणाची परवानगी दिली होती. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर मोठं भाष्य केलं आहे. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मराठा आरक्षण देण्यावर ठाम आहेत. मात्र, घाई गडबडीत दिलेलं आरक्षण टिकायला हवं, यासाठी महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं की, 'मराठा आरक्षणाला माझंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समर्थन असल्याचे स्पष्ट केलंय. अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यानंतरच्या सरकारकडून ते टिकवता आलं नाही. जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे'.

'आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. काही ठराविकच लोक मराठा समाजात सधन आहेत. इतर मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये सुद्धा परवडत नाही. यामुळे मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यावर काम आहेत. जे आरक्षण द्यायचं आहे ते घटनेमध्ये बसणार असावं. देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही. कायदेशीर आरक्षण टिकायला हवं. मिळालेले आरक्षण चार महिन्यात रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते यावर योग्य तो तोडगा काढतील, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईपण भारी देवा! शिक्षक झाल्या, ८ महिन्याच्या मुलाला सांभाळत केली UPSCची तयारी; IAS मोनिका रानी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी! आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल

Uddhav-Raj Thackeray: शिवसेना- मनसे एकत्र येणार? महापालिकेसाठी ठाकरे सेनेचा मविआला रामराम? वाचा स्पेशल रिपोर्ट

Shani Budh Yuti: दिवाळीनंतर बनणार नवपंचम राजयोग; वर्षाच्या अखेरीस 3 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

SCROLL FOR NEXT