Maratha Reservation  saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Maratha Reservation : एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे तर त्यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी बांधव आंतरवाली सराटी येथे धरणे आंदोलन करत आहे.

Girish Nikam

  • नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांच साखळी उपोषण सुरु आहे.

  • मराठा आरक्षणासाठी मराठवाडा गॅझेटियर एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज

  • ओबीसी बांधव आंतरवाली सराटी येथे धरणे आंदोलन करत आहे.

मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष उडालेला असताना आता ओबीसी नेतेही आक्रमक झालेत. ओबीसी नेत्यांची मुंबईत METमध्ये बैठक झाली. मंत्री छगन भुजबळ, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते.नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांच साखळी उपोषण सुरु आहे. त्यामुळे महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे भुजबळांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

आंदोलनावर ठाम राहून मनोज जरांगेंनी सरकारला घाम फोडलाय. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झालेत. मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याची मागणी मंत्रिमंडळ उपसमितीतील काही सदस्यांनी केल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाडा गॅझेटियर एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.

गॅझेटियरमध्ये मराठवाड्यातील मराठ्यांचा 'कुणबी', असा उल्लेख आहे. याशिवाय मराठा समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दर्जा अत्यंत मागासलेला होता असाही उल्लेख आहे. या आधारे उपसमितीतील काही सदस्यांनी मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याची मागणी केलीय.

दुसरीकडे जालन्यातील अंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये ओबीसींच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झालीय. ओबीसी आंदोलक बाळासाहेब बटुळे, बाळासाहेब दखने, विठ्ठल तळेकर, श्रीहरी निर्मल यांनी ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे तर त्यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी बांधव आंतरवाली सराटी येथे धरणे आंदोलन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT