मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यभरातून लोक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात येत आहेत.
नांदेडहून रेखा पाटील नावाच्या महिला भगिनीनेही जंरागे यांची भेट घेतली. मात्र मनोज जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून आरोग्यसेविका असलेल्या रेखा पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सरकार मनोज जरांगे यांचा जीवच घ्यायचा आहे, असा आरोपही रेखा पाटील यांनी केला.
सरकारने ४० दिवस काय केले. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? असा सवालही रेखा पाटील यांनी सरकारला विचारला. (Live Marathi News)
मनोज जरांगे यांची एक एक पेशी मरायला लागली आहे. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचा बीपी अत्यंत लो झाला आहे. त्यांचा तातडीने सलाईन लावणे गरजेचं आहे. अन्यथा माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. तुम्ही सगळं बंद करा आणि माझ्या भावाचा जीव वाचवण्याचं बघा, अशी साद देखील त्यांनी सरकारला घातली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरक्षण मिळणारच आहे. मात्र आता मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. आपण बघ्याची भूमिका घेणे अत्यंत मुर्खपणा ठरु शकतो. आपण त्यांचा जीव घ्यायचा का? त्यानंतर आरक्षण घेऊन करायचं काय? माझा भाऊ आरक्षण पाहायला जिवंत राहिला पाहिजे. तो तडफडून मरत आहेत, हे बघत राहायचं का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.