CM Devendra Fadnavis in Pune addresses media on Maratha agitation, stresses dialogue for quick resolution. saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग काढू; आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CM Fadnavis On Maratha Reservation Agitation: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिलीय. चर्चेतून हा प्रश्न लवकर सुटू शकतो, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलनाबाबत महत्त्वाचं विधान केलं.

  • “चर्चेतून लवकर तोडगा निघेल” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं.

  • पुण्यातील पूल उद्घाटनावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. चर्चेला कोणी आले तर लवकर मार्ग काढता येईल. चर्चा अशी माईकवर होत नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील एका उद्धघाटन कार्यकमात हजेरी लावली होती. सिंहगड रोडवरील एका पुलाचे उद्धघाटन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान मुंबईतील होणाऱ्या मराठा आंदोलनाविरुद्धात आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीत कोर्टानं सरकारसह आंदोलनकर्त्यांना फटकारलं. कोर्टाच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय. सरकार सामंजस्याच्या भूमिकेमध्ये आह, पण कोर्टाने कडक आदेश दिले तर ज्याप्रकारची कारवाई केली, पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल.असं मुख्यमंत्री म्हणाले.

उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीनंतर सांगितलं की, जर तुमचं कोणतं शिष्टमंडळ असेल किंवा चर्चा करणारे कोणी असतील तर त्यांच्यासोबत चर्चा करू. पण आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा करायची तर कोणासोबत करावी हे कळत नाही. माईकवर अशी चर्चा होत नसते.

माईकवर चर्चा होते का? असा सवाल करत फडणवीस म्हणाले की, जर त्यांच्याकडून काही आलं तर आम्ही त्यांच्या निवेदनातून मार्ग काढू. चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर मार्ग काढू. सरकारला कोणत्याच प्रकारची आडमुठ्यापणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधी कोणता इगो धरत नाही. त्याच्यातून मार्ग काढत आहोत. जर कोणी चर्चेला आलं तर लवकर मार्ग निघेल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

उपसमिती बैठकीत आरक्षणावर चर्चा...

"आमच्या बैठकांमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींचा आणि पर्यायांचा विचार केलाय. आम्ही विचार केलेले पर्याय कोर्टासमोर कशा पद्धतीने टिकू शकतील याबाबत चर्चा झालीय. तर त्याबाबत काही अधिकची माहिती मागवण्यात आली आहे. ती माहिती आल्यावरही आम्ही पुन्हा एकदा चर्चा केल. यावर जो मार्ग काढायचा आहे तो कायदेशीर पद्धतीनेच काढला जावा, अशी आमची इच्छा आहे. याबाबतच आमची कार्यवाही सुरू असल्याचं फडणवीस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष

Maratha Protest: मराठा बांधवांचा जल्लोष; पाटील बोलते सबको को** | VIDEO

Manoj Jarange Full Name: मनोज जरांगे याचं पूर्ण नाव काय आहे?

Reem Shaikh: वेस्टर्न आउटफिटमधील रीम शेखचे सुंदर लूक, तुम्ही पण करु शकता रिक्रिएट

Accident : टायर फुटल्याने पोलीस कारचा भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT