Maratha Reservation  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब; अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले...

Adv. Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान याचिकार्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिला आहे.

Sandeep Gawade

Maratha Reservation

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान याचिकार्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकांची सुनावणी मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांसोबत करण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. आमदार, खासदार कशाप्रकारे मराठा समाजातून निवडून येतात हे कोर्टासमोर पटवून दिलं, त्यामुळे मराठा समाज मागास नाही हे आम्ही कोर्टाला दाखवून दिलं आहे. मागील आरक्षणाच्या निर्णयावरही या आरक्षणाचा निर्णय अवलंबून आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

बातमी अपडेट होत आहे....

आरक्षणासंदर्भात सरकारला अधिकार होते का नव्हते यापासून सुरुवात आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी युक्तिवाद संपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद आटोपताच मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता युक्तिवाद करणार आहेत.सुनावणी लवकरात लवकर संपवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आग्रही आहे.मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपिठाकडे एकत्रित सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारने मुदतवाढीची केलेली मागणी फेटाळली होती.

गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णपिठासमोर सुनावणी झाली. राज्याचे महाधिवक्ता यांनी बाजू मांडली आणि वेळ वाढवून देण्याची मागणी केली मात्र कारणं तुटपुंजी होती. मी आणि इतर वकिलांनी आमची बाजू मांडली आणि या प्रकरणाचं महत्त्व कोर्टाला समजावून सांगितलं. येणाऱ्या काळात सुट्ट्या असल्याने तातडीच्या सुनावणीची आमची मागणी होती. आज न्यायालयाने सुनावणीला सुरुवात केली ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वैद्यकीय प्रवेश असतील इंजीनियरिंग प्रवेश, नोकर भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती असेल त्या अनुषंगाने ही महत्त्वाची गोष्ट आहे.

आम्ही आमच्या याचिकेत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना प्रतिवादी केले असल्याने त्या मुद्द्यावर राज्य सरकारला सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करता आली नाही. सोमवार पासून नियमित सुनावणीला सुरू होईल. आमदार खासदार कशाप्रकारे मराठा समाजातून येतात, त्यामुळे मराठा समाज मागास नाही हे आम्ही कोर्टाला दाखवून दिलं. मागील आरक्षणाच्या निर्णयावर या आरक्षणाचा निर्णय देखील अवलंबून आहे असं सध्या दिसतंय. सुट्टीच्या आधी स्थगिती संदर्भातला निकाल येईल.ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकांची सुनावणी मराठा आरक्षणा विरोधातील याचिकांसोबत करण्याची मागणी कोर्टाने स्वीकार केली नाही.आरक्षणा संदर्भात सरकारला अधिकार होते का नव्हते यापासून सुरुवात आहे, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT