ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा नारा देत मनोज जरांगे मुंबईत धडकण्यावर ठाम आहेत.. मात्र त्यापुर्वीच जरांगेंच्या वक्तव्याने वादाचं मोहोळ उठलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करु न दिल्याचा खळबळजनक आरोपच मनोज जरांगेंनी केलाय..मात्र आमच्यात कुणी कितीही काड्या टाकल्या तरी आम्ही सोबतच, असा पलटवार फडणवीसांनी केलाय..
खरंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगेंनी 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलं.. त्यावर लाठीचार्ज झाल्याने हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला.. तर पुढे सरकारने माजी न्यायमुर्ती संदीप शिंदेंच्या नेतृत्वात कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलीय..या समितीने 57 लाख नोंदींचा शोध घेतला.. याच आधारे जरांगेंना सगे सोयरे अध्यादेशाचा मसुदा सोपवण्यात आला.. पुढे मराठा समाजासाठी SEBC मधून 10 टक्के आरक्षणही देण्यात आलं. त्यानंतर निवडणुकांमुळे आरक्षणाचा मुद्दा बारगळला होता.. मात्र आता जरांगेंनी पुन्हा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिलाय.. यावेळी जरांगेंनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?
मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा
हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा
आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा
मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने येणार हे निश्चित झालंय.. दरम्यान आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकल्यास सरकारची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र गणेशोत्सव मुंबईऐवजी दरे गावी साजरा करण्याचं जाहीर केलंय.. त्यामुळे जरांगेंकडून फडणवीसांवर निशाणा साधून एकनाथ शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर करण्यात येत असल्याने जरांगे-शिंदे साथ-साथ आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.