Maratha Protester Manoj Jarange’s Relative Among 9 Exiled for Sand Smuggling in Jalna 
महाराष्ट्र

jalna News : मनोज जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई, जालन्यात प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर

jalna Crime : जालन्यामध्ये ९ जणांविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याचाही समावेश आहे. वाळू माफियाविरोधात प्रशासन आक्रमक झाले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

jalna Crime News : जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलेय. ९ आरोपींविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली. या तडीपारीच्या कारवाईत मराठा आंदोलकांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेले 9 आरोपी जालना जिल्ह्यासह बीड ,संभाजीनगर ,परभणी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली.

जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल आहे, मनोज जरांगे यांचा मेहुना विलास खेडकर याच्यावर देखील, तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपीवरती परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.

सदर आरोपीवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्ला करणे यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत..सदर आरोपी वरती 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.अंबड उपविभागीय न्यायदंडाअधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव पेंडिंग असल्याच देखील माहिती मिळत आहे.

यांच्यावर झालीय तडीपारीची कारवाई

1) गजानन गणपत सोळुंके,2) केशव माधव वायभट, 3) संयोग मधुकर सोळुंके, 4) विलास हरिभाऊ खेडकर, 5) अमोल केशव पंडित, 6) गोरख बबनराव कुरणकर, 7) संदीप सुखदेव लोहकरे, 8) रामदास मसूरराव तौर 9) वामन मसुरराव तौर .

विलास हरिभाऊ खेडकर याला जालना , बीड, आणि परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आलेय. वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.2023 मध्ये जालनातल्या शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 100 ब्रास आणि 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे गोंदी पोलिसात दाखल आहे. यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT