Maratha Reservation  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंसह मराठ्यांचं वादळ आज मुंबईकडे कूच करणार; अंतरवाली सराटीत तुफान गर्दी

Satish Daud

Maratha Reservation Latest News

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. यासाठी मोठी तयारी करण्यात आली असून शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर जालन्यातील अंतरवाली सराटी गावात भल्यापहाटे मराठा बांधवांनी गर्दी केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी साम टीव्हीला दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. २३ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या, असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला होता.

मात्र, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणावर तोडगा काढला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. दरम्यान, २० जानेवारीच्या आधी आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत येऊन आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला होता.

त्यानुसार, आज जरांगे (Manoj Jarange Patil) लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात जमा झाले आहेत. मुंबईसाठी निघणाऱ्या पायी दिंडीसाठी मराठा बांधव सज्ज झाले आहेत.

जीव गेला तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, अंतरवाली आज सराटी येथून निघालेली मराठा बांधवांची पायी दिंडी येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मुंबईतील मराठा मोर्चा टाळावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हा शब्द आम्ही दिलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT