Maratha Reservation  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय कोल्हापुरातील मराठा नेत्यांना तुर्तास मान्य नाही, कारण...

Kolhapur Leader Reaction on Maratha Reservation : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांची आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

 मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज अंतरवाली सराटी येथून पायी नवी मुंबईत दाखल झाला. लाखोंच्या सख्येंने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होता. मात्र त्याआधीचा राज्य सरकारने मराठा बांधवांना गुडन्यूज दिला.

मनोज जरांगे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते, त्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सुपूर्द केला. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांना मान्य नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांची आहे. राज्य शासनाने मनोज जरांगे यांना दिलेली कागदपत्रे कोल्हापुरातील ज्येष्ठ विधी तज्ञांमार्फत तपासून घेणार असल्याचं मराठा नेत्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

राज्य शासनाने मराठा समाजासाठी दिलेला जीआर कोर्टाच्या पायरीवर टिकणारा आहे की नाही या संदर्भात उद्या मराठा समाजातील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीनंतर मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

'सगेसोयरे' कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही - छगन भुजबळ

सगेसोयरे जे आहेत ते कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाहीत, असं माझं मत आहे. मराठा समाजाच्या सुद्धा निदर्शनास आणून द्यायचं आहे की, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही आनंद व्यक्त करताय. परंतु दुसरी बाजू लक्षात घ्या ओबीसी आरक्षणात आता ७०-८० टक्के लोक येतील. ईडब्लूएसमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं ते आता मिळणार नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT