Maratha Kranti Thok Morcha, dhananjay sakhalkar , sadabhau khot, pandharpur news saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Thok Morcha : 'सदाभाऊ खोतांचा डीएनए तपासण्याची वेळ आली'

आज तुम्हीच मराठा नेत्यांवर टिका करत आहात हे याेग्य नसल्याचे साखळकर यांनी नमूद केले.

भारत नागणे

Pandharpur News : मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या टिकेला मराठा ठोक क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra News)

सदाभाऊ खोत यांनी मराठा नेत्यांनी 70 वर्षांत आरक्षण का दिले नाही असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टाका केली होती. त्यावर साखळकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत तुमचा डीएनए चेक करायची वेळ आली आहे अशी जहरी टिका मराठा ठोक क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी खाेत यांच्यावर केली आहे. ते म्हणाले प्रस्थापित मराठ्यांचे झेंडे घेवून तुम्हा सर्वांना मोठे करण्यासाठी आमच्या बापाने व आम्ही उन, वारा पाऊस कशाचीही परवा केली नाही.

आज तुम्हीच मराठा नेत्यांवर टिका करत आहात. खरंच तुम्ही मराठा आहे की नाही याची शंका आहे. तुम्ही रात्रीचा खेळ चाले यामध्ये जन्माला आला आहात असं वाटतय. पुन्हा मराठा नेत्यांवर टिका करताना विचारपूर्वक करा असा सल्ला साखळकर यांनी सदाभाऊ खाेत यांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT