sambhajiraje chhatrapati and sanjay raut & uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

सेनेने संभाजीराजेंचा अपमान केला, सत्तेचा माज शिवप्रेमी उतरवतील : मराठा क्रांती माेर्चा

आज राज्यसभेची उमेदवारी शिवसेना काेणाला देणार याची उत्सुकता जनतेस लागून राहिली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे , भारत नागणे

नवी मुंबई : राज्य सभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांना शिवसेना (shivsena) उमेदवारी नाकारणार असे चित्र स्पष्ट हाेताच राज्यातील विविध जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे (maratha kranti morcha) समन्वयक व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आगामी काळात शिवसेना आणि संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा मराठा क्रांती माेर्चाने दिला आहे. (sambhajiraje latest marathi news)

छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीला संजय राऊत हे सातत्याने विरोध करत आहेत. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल. राऊत यांना सन 2024 च्या निवडणुकीत माेठी राजकीय किंमत मोजावी लागेल असा इशारा नवी मुंबईत मराठा क्रांती माेर्चाने दिला.

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम म्हणाले एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढी वर्षे राजकारण करत आहात एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. त्यांचा अवमान करता. या शिवसेनेचा 'शिव' आमच्या छत्रपतींचा आहे, हे लक्षात ठेवा.

दरम्यान आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मराठा समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी आज पंढरपूरात (pandharpur) येथे दिला.

डोंगरे म्हणाले संभाजीराजेंना शिवसेना जाणून बुजून पक्षीय राजकारणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील २०० विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. शिवसेनेने संभाजीराजेंचा अपमान केला आहे. तो आम्ही कदापी सहन करणार नाही. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देऊ. अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना मदत करावी असे आवाहनही डोंगरे यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT