Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: धाराशिवमधली संचारबंदी हटविली, जमावबंदी कायम; बीडमध्येही नियम शिथिल

Dharashiv News : धाराशिवमधली संचारबंदी हटविली, जमावबंदी कायम; बीडमध्येही नियम शिथिल

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातर्फे आंदोलन सुरु आहेत. या (Maratha Aarkshan) आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर (Dharashiv News) धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली होती. मात्र आज हि संचारबंदी हटविली आहे. मात्र जमावबंदी व शस्त्र बंदी कायम ठेवण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून राज्यातील अनेक भागात गाड्यांची तोडफोड व जाळपोड करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान आज धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी हटवली असून जमावबंदी व शस्त्र बंदी लागू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी काढले आहेत. 

१५ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी कायम 

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. यानंतर संचारबंदी उठविण्यात येईल. मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी व शस्त्र बंदी लागू असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातही हटविली संचारबंदी

मराठा आरक्षणाचे आंदोलन बीड जिल्ह्यात देखील तीव्र स्वरूपात होते. येथे गाड्यांची तोडफोड झाली होती. यामुळे बीडमध्ये देखील संचारबंदी लागू कारणात आली होती. आज हि संचारबंदी उठविण्यात आली आहे. मात्र अजूनही काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बीडमध्ये एडीजी सक्सेना, आयजी ज्ञानेश्वर चव्हाण, आयजी प्रसन्ना, आपीएस पंकज देशमुख यांच्यासह बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तळ ठोकून आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT