yavatmal, maratha andolan saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan In Yavatmal : यवतमाळला कडकडीत बंद, सकल मराठा समाजाने राेखला नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

मराठा कुणबी क्रांती मोर्चाकडून यवतमाळ शहरातील धामणगाव चौफुली येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Maratha Reservation News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi latest updates) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी सकल मराठा समाजाने आज (मंगळवार) यवतमाळ शहर बंदची (yavatmal band) हाक दिली आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान सकल मराठा समाजातर्फ आजही राज्यातील विविध जिल्ह्यात आंदाेलन छेडण्यात आले आहे. (Maharashtra News)

यवतमाळ शहर कडकडीत बंद केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वळवला. राष्ट्रीय महामार्ग तब्बल एक तास झाले रोखून धरला. महामार्गावर टायर जाळण्याच्या कारणावरून आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

दरम्यान घटनचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड हे रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदाेलकांनी लाठीचार्ज संदर्भात आदेश देणाऱ्यासह सरकरचा तीव्र निषेध नाेेंदविला.

यवतमाळला अज्ञातांनी दुकान फोडली

यवतमाळ शहरातील संपुर्ण बाजारपेठेतून सकल कुणबी मराठासह इतरही समाज बांधव रस्त्यावर आला हाेता. एक युवक दुकानावर दगडफेक करताना आंदोलकर्त्यांना आढळून आल्यानंतर त्यांनी त्या तरूणाला पोलीसांच्या ताब्यात दिले.

मराठा कुणबी क्रांती मोर्चाकडून यवतमाळ शहरातील धामणगाव चौफुली येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT