Shravan Maas 2023: सावधान! श्रावण महिन्यात भीमाशंकरला दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी वाचाच...

Bhimashankar Temple Mobile Ban: भीमाशंकर मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. अशातच भीमाशंकर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Shravan Maas 2023 Mobile Ban In Bhimashankar Temple Area
Shravan Maas 2023 Mobile Ban In Bhimashankar Temple Area Saam TV
Published On

Bhimashankar Temple Mobile Ban: अधिकमास म्हणजेच धोंड्याचा महिना संपला असून श्रावणमास सुरू झाला आहे. श्रावण सुरू होताच महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रावर भाविकांची प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आज पहिला श्रावण सोमवार असल्याने ही गर्दी आणखीच वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या भीमाशंकर मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. अशातच भीमाशंकर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.  (Latest Marathi News)

Shravan Maas 2023 Mobile Ban In Bhimashankar Temple Area
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

भीमाशंकर (Bhimashankar) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

१२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाणारे भीमाशंकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात.  श्रावण महिन्यात (Shravan Month) भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गर्दीत अनेक अनुचित प्रकार घडत असतात. या संपूर्ण गोष्टींचा त्रास मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो.

Shravan Maas 2023 Mobile Ban In Bhimashankar Temple Area
Vijaykumar Gavit Speech : भाजप नेते विजयकुमार गावितांचा अजब दावा; ऐश्वर्या रायचा उल्लेख करत म्हणाले...

हीच बाब लक्षात घेता यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात फोटो काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा भीमा शंकर येथे देवदर्शनासाठी जात असाल, तर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com