Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Rajkot Fort Rada : 'जनता तुम्हाला सोडणार नाही', राजकोट राड्यावरुन मनोज जरांगे कडाडले; सरकारला दिला इशारा|VIDEO

Manoj Jarange Patil On Shivaji Maharaj Statue Collapse : राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी घटनास्थळी भेट दिलीय.

Rohini Gudaghe

विनायक वंजारे, साम टीव्ही सिंधुदुर्ग

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज १ सप्टेंबर रोजी घटनास्थळी भेट दिलीय. मनोज जरांगे यांनी घटनास्थळी पाहणी केलीय. घटनेवरून त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही हल्लाबोल केलाय. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, हे आपण सविस्तर पाहू या.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. मनोज जरांगे म्हणाले की, यात कोणीही राजकारण करू नये, जे छत्रपतींच्या जीवावर राजकारण करत आहेत. त्यांना आपण जास्त शहाणे असल्यासारखे वाटत आहे. एकमेकांवर चिखलफेक करू नका, जनता तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय.

शिवरायांचा पुतळा कोसळला...

ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर (Rajkot Fort Rada) बोलताना जरांगे म्हणाले की, राडा करणाऱ्यांचे ध्येय फक्त खुर्च्या मिळविणे हेच आहे. ह्यांना पुतळा कोसळण्याचे दुःख नाही, जर दुःख असते तर राडा केलाच नसता. आपापसात आंदोलन करून हे प्रकरण (Shivaji Maharaj Statue Collapse) जिरवू असे वाटत असेल, तर हे प्रकरण जिरणार नाही. आम्ही जिवंत आहोत, असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

राज्यभरात संतापाची लाट

मराठा आंदोलकांनकडून आज राजकोट किल्ल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. २६ ऑगस्ट रोजी शिवरायांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली होती. घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट (Manoj Jarange Patil News) आहे. शिवसैनिकांकडून सरकारचा निषेध केला जातोय. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव रस्त्यावर उतारल्याचं पाहायला मिळालंय. आज मराठा आंदोलक राजकोट किल्ल्यावर आहेत. राजकोट किल्ला एक मराठा, लाक मराठा या घोषणांनी दुमदुमला असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT