Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : अंतरवाली सराटी ते मुंबई... मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा आणि मार्ग ठरला! 'असं' असेल नियोजन

Maratha Reservation News : मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा बांधवांनी आपल्या वाहनांमध्येच जेवणाची व्यवस्था करावी. टँकर, अॅम्बुलन्स देखील सोबत घेण्यात येणार आहेत, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

रामू ढाकणे

Manoj Jarange Patil News :

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबई गाठणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे उपोषण करणार आहेत. मात्र त्याआधी ते लाखो मराठा बांधवांसह अंतरवाली सराटी येथून पायी मुंबईच्या दिशेने येणार आहे. मुंबईला येण्याच्या त्यांचा मार्ग कसा असेल, आंदोलनाची रुपरेषा कशी असेल याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आज सविस्तर माहिती दिली आहे.

मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसोबत २० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. जालना-बीड-अहमदनगर मार्गे पायी दिंडी मुंबईत दाखल होणार आहे.

मोर्चाचा मार्ग कसा असेल?

जालन्यातून निघालेला मोर्चा बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर गेवराई-पडळ शिंगीमार्गे अहमदनगरमध्ये पोहोचणार आहे. अहमदनगरमधून शिरुर, शिक्रापूर, रांजणगावमार्गे मुंबई-पुणे महामार्गावर दिंडी पोहोचणार आहे. त्यानंतर लोणावळा-पनवेल-वाशी-पनवेलमार्गे मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार आहे.

एक टीम मुंबईत जाऊन जागेची पाहणी करणार आहे. आझाद मैदानाची पाहणी करणार आहे. मोर्चा शांततेत काढा. अंतरवाली ते मुंबई दरम्यान अडीच लाख स्वयंसेवक हे पायी दिंडीमध्ये असणार आहे.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा बांधवांनी आपल्या वाहनांमध्येच जेवणाची व्यवस्था करावी. मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सुद्धा पायी दिंडीत सहभागी असणार आहेत. शिवाय किर्तन, भारूड ,लेझीम, यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन पायी दिंडीत केलं जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

SCROLL FOR NEXT