गणेश कवडे, साम टीव्ही
मुंबईतील मंत्रालयात प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या डीजी ॲपशी संबंधित मोठी त्रुटी समोर आली आहे. मंत्रालयात येणाऱ्या अनेक अभ्यागतांनी प्रवेशासाठी घेतलेली कार्ड परत न केल्यामुळे गहाळ पासेसचा आकडा तब्बल १० हजारांच्या जवळपास पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीकडून ज्यांनी कार्ड परत केले नाहीत अशा अभ्यागतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्रालयात पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी जुने कार्ड परत करणे बंधनकारक करण्यात आले असून, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अभ्यागत कोणत्या विभागात आले होते याचा संपूर्ण डेटा उपलब्ध असल्याने त्या आधारेही संपर्क मोहीम राबवली जात आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत सुमारे २०० ते ३०० कार्ड परत मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
भविष्यात असा प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘रिकव्हरी बॉक्स’ बसवण्यात येणार असून, बाहेर पडताना सर्व अभ्यागतांनी कार्ड त्यात टाकणे सक्तीचे करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.