Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, सरकारला दिला इशारा; म्हणाले - दसरा मेळाव्याला...

Maratha Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. 'हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून सरकारला हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र देण्याचा इशारा दिला.

  • येत्या दसरा मेळाव्यात जर मागणी मान्य झाली नाही तर भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली आणि अशा लोकांना भाव देऊ नये असे सांगितले.

  • मराठा समाजासाठी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगेंनी केली आहे. सरकारने मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी मान्य करत जीआर देखील काढला. त्यानंतर त्यांनि आमरण उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. 'येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळेल. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.', असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा देत सांगितले की, 'हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा. मनुष्यबळ द्या, अन्यथा नवीलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही. सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या म्हणताच बरेच जण पागल झाले. अभ्यासक ही पागल झाले. विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे. आणखी मोठा आनंद व्यक्त करू. काही लोक बिथरल्यासारखे झाले आहेत. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.'

मनोज जरांगेंनी नारायणगड येथे दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'या दसऱ्या मेळाव्याला ज्यांना यायचं आहे ते या. राधाकृष्ण विखे असतील, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस हे मराठ्यांचा अपमान करणार नाहीत. १०० मराठे जिंकले आहेत. आपला विजय बऱ्याच लोकांना पचला नाही. जीआरमध्ये काही चूक झाली असेल तर ती सरकारने बदलायला हवी. आम्हाला बाकी काही माहीत नाही. जर थोड इकडे तिकडे केले येवला येथील एकाचे ऐकून तर लक्षात ठेवा १९९४ चा देखील जीआर आम्ही रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ'

मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले 'तो कोण आहे मला माहित नाही. अशा लोकांना मी मोजत नाही. अशा लोकांना भाव देत जाऊ नका. ओबीसी नेत्यांची इतकी तडफड सुरू आहे म्हणून मराठा लोकांना सांगतो हुशार व्हा. हा जीआर आम्ही गरीब लोकांनी मिळून काढला असून अर्धा महाराष्ट्र परेशान आहे.' तसंच, 'आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही. आमच्यावरच हल्ले झालेले आहे. गुन्हे मागे घ्यावेच लागतील. काम करत असतील तर आम्ही कौतुक करणार. १७ सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र द्या अन्यथा मला दसरा मेळाव्यात निर्णय घेता येईल.', असा इशारा जरांगेंनी दिला.

मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले 'तो कोण आहे मला माहित नाही. अशा लोकांना मी मोजत नाही. अशा लोकांना भाव देत जाऊ नका. ओबीसी नेत्यांची इतकी तडफड सुरू आहे म्हणून मराठा लोकांना सांगतो हुशार व्हा. हा जीआर आम्ही गरीब लोकांनी मिळून काढला असून अर्धा महाराष्ट्र परेशान आहे.' तसंच, 'आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही. आमच्यावरच हल्ले झालेले आहे. गुन्हे मागे घ्यावेच लागतील. काम करत असतील तर आम्ही कौतुक करणार. १७ सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र द्या अन्यथा मला दसरा मेळाव्यात निर्णय घेता येईल.', असा इशारा जरांगेंनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी; १०-१२ जण जखमी... वाहनातून गणेश मूर्ती पडली

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT