Sadabhau Khot On Maratha Reservation  
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचा पिच्छा सोडावा आणि...; सदाभाऊ खोत यांचं आवाहन

Sadabhau Khot On Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी एक आवाहन केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवं असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी

Bharat Jadhav

महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येत आहे,अशी टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलीय. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडावा. त्यांनी आपला मोर्चा थेट बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा.

त्यांच्याकडून ओबीसीमधून मराठा समाजला आरक्षणा मिळवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र घ्यावं,आम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असं आवाहन सदाभाऊ खोतांनी मनोज जरांगेंना केलंय. त्याचबरोबर कोणाचेही आरक्षण, कोणालाही देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, असे स्पष्ट मतदेखील आमदार खोत यांनी व्यक्त केलंय.

विधान परिषदेतल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवावरून सदाभाऊ खोतांनी, शरद पवारांच्यावर निशाणा साधताना,शकुनी मामा प्रमाणे शरद पवारांनी डाव टाकून उद्धव ठाकरे यांना बाजूला करून भाजपची सत्ता घालवली आणि आपले सरकार आणले, मग विधान परिषदेला शेकपच्या जयंत पाटलांना ते निवडून का आणू शकले नाहीत ? असं सवाल करत शेकापा फोडण्याचे पाप शरद पवारांनी केलं होते,आणि ते संपवण्याचे देखील पाप शरद पवारांनीच केलं अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT