Manoj Jarange Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार; शिंदे सरकारसमोर ठेवली मोठी अट

Manoj Jarange: मनोज जरांगे यांनी मी उपोषण सोडण्यास तयार असून मात्र उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यावं अशी अट ठेवली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange News:

जालन्यात अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपोषण विनंती केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मी उपोषण सोडण्यास तयार आहे, मात्र उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यावं अशी अट ठेवली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, 'मराठा आरक्षण मिळेपर्यंत जागा सोडणार नाही. मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल तोपर्यंत मी घरी जाणार नाही. सरकारने जबाबदारी घेतली,मग मी घरी जाईन या भ्रमात राहू नका. आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवू.

'हातात सर्टिफिकेट पडतील, त्या दिवशी आंदोलन मागे घेईल. बोलता-बोलता आपले 15 दिवस गेले आहेत, पुढे महिना जाईल. मराठा आरक्षणासाठी सामान्य माणसाने आंदोलन उभं केला आहे. उग्र आंदोलन करू नका. सरकारला १ महिन्याची मुदत देत आहे. सरकारने 31 व्या दिवशी प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

'उपोषण सोडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे आले पाहिजे. आता महिनाभर गावात साखळी उपोषण सुरू करायचे आहे. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मराठ्यांची इतकी मोठी सभा होईल, असेही जरांगे म्हणाले.

दरम्यान, 'मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश.

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

Maharashtra Tourism: वीकेंडला कुठं जावं? शांत, सुंदर आणि निवांत…; नागपूरमधील 'ही' ठिकाणं पिकनिकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT