Maratha Arakshan : CM शिंदेंचा खास संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानानं मनोज जरांगेंच्या भेटीला

Political News : उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत.
Uday Samant-manoj jarange
Uday Samant-manoj jarangeSaam TV

Jalna News :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागील १५ दिवसापासून आंदोनल सुरु आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशा विनंतीचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत काल मंजूर झाला. उपोषणामुळे मनोज पाटलांची प्रकृती देखील खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास संदेश घेऊन विशेष विमानाने जालन्यातील आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.

Uday Samant-manoj jarange
Manoj Jarange: मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार; शिंदे सरकारसमोर ठेवली मोठी अट

उदय सामंत आज जळगावात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत. (Latest Marathi News)

Uday Samant-manoj jarange
Nana Patekar On Latest Content: 'अत्यंत घाणेरडा कन्टेन्ट...', बॉलिवूड चित्रपटाविषयी नाना पाटेकर यांचं मोठं विधान

मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपोषण विनंती केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मी उपोषण सोडण्यास तयार आहे, मात्र उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यावं अशी अट ठेवली आहे.

तसेच महिनाभर गावात साखळी उपोषण सुरू करायचे आहे. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मराठ्यांची इतकी मोठी सभा होईल, असेही जरांगे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com