Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील ४ नाही तर ८ जूनला बसणार उपोषणाला, सरकारवर केले गंभीर आरोप

Priya More

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तारीख बदलली आहे. जरांगे पाटील उद्या नाही तर ८ जूनला आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे जरांगे पाटील संतप्त झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसंच सरकारने उपोषणाला नाकर देण्यासाठी डाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. आपण याची परवानगी सुरुवातीला घेतली आहे. ज्या ज्या वेळी आंदोलनं आणि उपोषणं सोडली. त्यावेळी ते स्थगित केल्याने पुन्हा सरू केली. स्थगितचा नियम असा आहे ते पुन्हा सुरू करता येते. तसंच हे सुद्धा आहे. आपण हे आमरण उपोषण ४ जूनला करणार आहोत. आंदोलन स्थगित केले होते ते पु्न्हा सुरू केले आहे. याला परवानगीची गरज नाही. परवानगी आणि संरक्षणासाठी आपण त्यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे.'

तसंच, '१५ दिवसांपूर्वी परवानगीचे निवेदन दिले. इथून मागे कधीच अडथळा आला नाही. पण उद्या ४ तारखेला १० वाजता आपण उपोषणाला बसणार होतो. पण पोलिस प्रशासनाने शासनाच्या दबावामुळे ३ तारखेला परवानगी नसल्याचे सांगितले. उपोषणाला परवानगी नसल्याचे कारण काहीच नाही. आधी यांना अडचण आली नाही. त्यांनी कारण दिले की ६ तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता आहे आणि कायद्याचे पालन केले पाहिजे. ४ तारखेच्या आमरण उपोषणाला गृहमंत्र्याकडून दबाव आला आहे की हे आंदोलन होऊन द्यायचे नाही.', असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला की, 'जर उपोषण नाकारायचे होते तर आधीच नाकारायचे होते. याचा अर्थ असा त्यांचा दोन डाव आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केले म्हणून आपल्यावर खोटो गु्न्हे दाखल करायचे. कायदा सुव्यवस्था बिघडायची की नाही हे निकालावर आहे. काहीही झाले तर त्यांच्या त्यांच्यामध्ये होणार आहे. पण ते आपल्यावर ढकलणार आहे. आपल्या करोडो लोकांचे आंदोलन अशापद्धतीने त्यांना चिरडायचे आहे.'

'मी चतुर आहे माझा समाज चतुर आहे म्हणून हे उघडं पडत आहे आणि आपण आतापर्यंत टिकलो आहे. हजारोंनी विरोध केला पण हे आंदोलन मी बंद करत नाही. कुणी येऊ द्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेत नाही. माझा जीव गेला तरी मी आंदोलन मागे घेणार नाही. त्यांनीच धिंगाणा करायचा आणि आपल्यावर ढकलायचे. जातीय तेढ हेच निर्माण करू शकतात. ज्यांना आंदोलन होऊ वाटत नाही ना तेच करू शकतात. यांचा डाव शिजून देऊ नये असं त्यांचे सुरू आहे. आतापर्यंत यांनी अनेक डाव मोडले आहेत. पण आपण मागे हटायचे नाही.', असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

तसंच, 'मी सर्व मराठा बांधवाना आवाहन आहे की, शांत राहा. कोणी निवडून आला, कोणी पडला तरी तुम्ही काहीही करू नका. कोणाला पाय लावायचे नाही आणि कोणाच्या वाट्याला जायचे नाही. कोण काय चूक करते ते शांतपणे बघायचे एक महिन्यानंतर बघू काय करायचे. आता यांनी डाव टाकला म्हणून उद्याचे उपोषण हे ८ जूनला ठरले आहे. आचारसंहिता नाही तर यांना हे आंदोलन मोडायचे होते.' असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT