manoj jarange patil criticized dhananjay munde 
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण, ८ मागण्या कोणत्या?

Manoj Jarange hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटीत स्थगित केलल उपोषण पुन्हा सुरू करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासह इतर आठ मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil, Maratha reservation, hunger strike : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज आमरण उपोषण आंदोलनाला बसणार आहे .आंतरवाली सराटी स्थगित केलेले उपोषण मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा सुरू करणार आहे.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 18 महिन्यापासून आंदोलन करीत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केले असून एकदा मुंबई वारी देखील केली आहे.. आता पुन्हा नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील सातव्यांदा आजपासून आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटीत बसणार आहे.

या आहेत मुख्य आठ मागण्या

1) महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे...

2) हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर,बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर,लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी...

3) मा. न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे . मा. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी....

4) सगे- सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्या प्रमाणे सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी...

5) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे...

6) सरकारने 10 टक्के sebc आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं...

7) कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ,कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे .वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी...

8) महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे. आणि 2004 सालीचा अध्यादेश आहे. म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात -उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे .हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे..

आतापर्यंत कधी कधी केलं उपोषण ?

उपोषण पहिले

29 ऑगस्ट 2023 - मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले

1 सप्टेंबर 2023 - जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेते,संघटना यांनी मनोज जरांगे यांना भेटी दिल्या.

14 सप्टेंबर 2023 - मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिलं उपोषण सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन स्थगित केले.

उपोषण दुसरे

25 ऑक्टोबर 2023 - सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले,

30 ऑक्टोबर 2023 - माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली,

02 नोव्हेंबर 2023- न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे,उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यतची मुदत देऊन उपोषण स्थगित केले

जरांगेंचा मुंबई मार्च

20 जानेवारी 2024 - मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले..

26 जानेवारी 2024 - मुख्यमंत्रांनी सगे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगें पुन्हा अंतरवाली पोहोचले..

उपोषण तिसरे

10 फेब्रुवारी - मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले

20 फेब्रुवारी - विधानसभेचे विशेष अधिवेशनात मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झाले.

25 फेब्रुवारी - उपोषणा दरम्यान मनोज जरांगे मुंबईतील सागर बंगल्यावर निघाले.जरांगेंना पोलिसांनी भांबेरी गावात रोखल.

26 फेब्रुवारी -17 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडल

उपोषण चौथे

8 जून : सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.

13 जुनः राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी 13 जुलै पर्यत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी चौथ आमरण उपोषण स्थगित केलं.

उपोषण पाचवे

20 जुलै: सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह राज्यातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे या मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले,

24 जुलै: गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडलं

उपोषण सहावे

17 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले

25 सप्टेंबर: गावातील महिलांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT