Manoj Jarange : गुंडगिरी, हत्या, छेडछाडी, दरोडे, खंडण्या; बीडच्या पालकमंत्रिपदावरून मनोज जरांगे स्पष्टच बोलले

Manoj Jarange on beed guardian minister : बीडच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बीडचं पालकमंत्रिपद हुकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News Saam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे यांचं बीडचं पालकमंत्रिपद हुकल्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून वगळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमचा विषय न्यायाचा असून बीडमधील चुकीच्या पद्धतीचा आहे. बीड चाललेली गुंडगिरी,हत्या,छेडछाडी,दरोडे, खंडण्या मागून त्यातून हत्या करणे याविषयी आमचा रोष आहे. ती मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. ते बीडमधील राजकारणावर बोलत होते.

Manoj Jarange Patil
Walmik Karad : २ ऑफिस, ३ फ्लॅट, ३५ एकर जमीन; वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर कोट्यवधींचं घबाड, सातबाराच आला समोर

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडच्या राजकारणावर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'पालकमंत्रिपदावरून कुणाला वगळायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्व अधिकार सरकारला आहे. आमचा न्यायाचा विषय आहे. आता चालत असलेला बीडमधील प्रकार चुकीच्या पद्धतीचा आहे. आता चाललेली गुंडगिरी,हत्या,छेडछाडी,दरोडे, खंडण्या, हत्या करणे याविषयी आमचा रोष असून त्यामुळे धनंजय मुंडे पालकमंत्रिपदी नको असल्याची आमची मागणी होती'.

Manoj Jarange Patil
Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? काय आहे नेमकं प्रकरण? पाहा स्पेशल रिपोर्ट

'आम्ही कुठल्या जात समुदायाला कधीच टार्गेट केलं नाही. हा राजकीय पदाचा आमचा विषय नाही. आमचा न्यायचा विषय असून त्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला देखील दिला आहे. खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच आहेत. जेवढी साखळी असेल, तिचा देखील नायनाट केला जाईल, असेही जरांगे यांनी सांगितले आहे.

Manoj Jarange Patil
Dhananjay Munde: 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा', अजित दादांसमोर धनंजय मुंडे फडाफडा बोलले..

धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनातील वक्तव्यावर भाष्य करताना जरांगे म्हणाले, 'पूर्णविराम वगैरे मिळत नसतो, हत्या झाली आहे. तुमचं राजकारण चुलीमध्ये घाला. या चार्जशीटमधील खंडणीतील आणि हत्येतील एकही आरोपी सुटता कामा नये. हे सर्व 302 मध्ये आले पाहिजे, त्यांना सांभाळणारे देखील आहेत. हत्या करणाऱ्यांपेक्षा आणि खंडी मागण्यापेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com