Manoj Jarange Patil Devendra fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: "..तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही", मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange: नांदेडमध्ये मराठा आरक्षण संवाद बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

Saam Tv

संजय सूर्यवंशी (साम टीव्ही)

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारला आहे. २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्यभरातील मराठा समाजाने एकत्र येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षण बैठकीदरम्यान उपोषणासंबंधित निर्णय घेण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांनी "पूर्वी जे सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. पूर्वी टोलवाटोल होत होती. पण आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता फडवणीस यांना आरक्षण देण्यासाठी कोणीही अडथळा आणणार नाही. ते २५ जानेवारीला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील. जर त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी द्वेष असेल तर ते मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढणार नाहीत", असे विधान केले आहे.

'मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरु देणार नाही', असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. नांदेडच्या मराठा आरक्षण संवाद बैठकीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे. २५ जानेवारीला ते आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

नांदेडच्या लोहा येथे मराठा आरक्षण संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी समस्त मराठा समाजाला उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. "आपल्याकडे जे वाहन मिळेल, त्या वाहनाने २५ जानेवारी रोजी अंतरवाली सराटीला या. आपल्या समाजातील लेकरासाठी एक दिवस काम सोडून आंदोलनासाठी या", असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Road Accident : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर; वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलन

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Diabetes Fruits: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी खुशखबर! हे फळ खा, ब्लड शुगरची काळजी सोडा

SCROLL FOR NEXT