Santosh Deshmukh Case: १० दिवसांत आरोपींना अटक करा नाहीतर..., गावकऱ्यांनी पोलिसांना दिला अल्टिमेटम; जलसमाधी आंदोलन मागे

Massajog Villagers Ultimatum To Police: १० दिवसांत आरोपींना अटक करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिला आहे. ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं आहे.
Santosh Deshmukh Case: १० दिवसांत आरोपींना अटक करा नाहीतर..., गावकऱ्यांनी पोलिसांना दिला अल्टिमेटम; जलसमाधी आंदोलन मागे
Massajog Villagers Ultimatum To PoliceSaam Tv
Published On

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन तासांपासून सुरू असलेलं मस्साजोगच्या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन अखेर मागं घेण्यात आले आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन पोलिस अधीक्षक नवनीत कावात यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागं घेतलं.

१० दिवसांत आरोपींना अटक करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सकाळपासून गावाजवळील तलावात जलसमाधी आंदोलन करायला सुरुवात केली होती. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होत्या. अखेर तहसिलदार आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ आरोपींना तात्काळ अटक करा, या प्रमुख मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थांनी सकाळी १० वाजल्यापासून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.

गावकऱ्यांनी गावातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले. तरी देखील ३ आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तात्काळ या फरार आरोपींना अटक करावं, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले.

मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनामध्ये अख्ख गाव तळ्यात उतरले होते. आंदोलनकांमध्ये पुरूषांसोबत महिलां देखील मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

ग्रामस्थांनी प्रशासनाला आज सकाळी १० वाजेपर्यंतचा वेळ दिला होता पण तिघांना अटक न झाल्यामुळे गावकऱ्यांनी मोठया संख्येने एकत्र येत जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. पण आता पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामस्थांनी पोलिसांना १० दिवसांचा अल्टिमेटम दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com