Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचं मध्यरात्रीपासून उपोषण सुरू, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का?

Manoj Jarange Patil Latest News : मनोज जरांगे पाटील यांनी सलग सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.

Satish Daud

मनोज जरांगे पाटील यांनी सलग सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात दंगली झाल्यास दोन्ही नेते जबाबदार असतील, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मी सरकारला कुठलाही अल्टिमेटम देणार नाही. त्यांनी स्वत: आरक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांना ही संधी आहे, असंही जरांगे म्हणाले.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करून महायुती सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठा बांधवांनी आपली कामे सोडून अंतरवाली सराटी येथे येऊ नये, अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली. माध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. तसेच हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं.

तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, मी कोणतीही राजकीय भाषा वापरणार नाही. आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला सर्वकाही भोगावं लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीत काही पाड्या पाडी झाल्या तर मला कुठलाही दोष द्यायचा नाही. मी दिसावं म्हणून कधीच आंदोलन करत नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धनगर समाजाच्या नेत्यांसोबत अत्यंत महत्वाची बैठक घेतली आहे. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आरक्षणासंदर्भात अतिशय सकारात्मक रोडमॅप बनवण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे असा मला विश्वास आहे, आम्ही त्या दिशेने आम्ही पुढे जात आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माढामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचा विजय

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT