Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange : राज ठाकरे म्हणाले आरक्षणाची गरज नाही, मनोज जरांगे संतापले; म्हणाले, आरक्षणातलं कळत नाही...

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, आरक्षणातलं कळत नाही त्यांच्यावर काय बोलावं, फडणवीसांवरही निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Manoj Jarange Patil : ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापुरात संताप व्यक्त केला. सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. राज ठाकरेंच्या (raj thackeray) वक्तव्याला मनोज जरांगें पाटील (Manoj Jarange) यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांना आरक्षणातील काही कळत नाही, त्यांच्यावर काय बोलावं? असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केले आहे. त्याशिवाय राज ठाकरेंना त्यांचे मित्र भडकवत असल्याचा आरोपही केलाय.

मनोज जरांगेंची ठाकरेंवर टीका -

राज ठाकरेंना त्यांचे मित्र भडकवत आहेत. त्यांना सांगा मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही. मराठे फक्त हक्क मागत आहे. तुमचा मित्र त्याला तुम्ही रोज भेटता, सागर बंगल्यावर जाऊन डोके भडकत आहेत. त्यांनी मराठ्याचे नेते विरोधात घातले, ओबीसी नेते विरोधात घातले, असा आरोप फडणवीस यांच्यावर केला.

मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही करू पण नका. त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही, ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही त्यांच्यावर काय बोलावं, अशी उपरोधीक टीकाही मनोज जरांगेंनी केली.

दहा टक्के आरक्षण दिलं नसतं तर ews सुरु राहिलं असतं - मनोज जरांगे

ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये मुस्लिमांचा फायदा होत आहे, हे यांचं दुखणं असून मी कधी म्हणलो. मराठ्यांच ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करा. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. एसईबीसी दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात कुठेही गुलाल उधळला नाही. दहा टक्के आरक्षण मराठ्यांना मान्य नाही. Ews रद्द करून मराठ्यांच सरकारने वाटोळ केल असं देखील जरांगे म्हणाले.मनोज जरांगेंमुळे मराठ्यांच ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्याने त्यात मुस्लिम समाजाचा फायदा होत असल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रीया दिलीय.

तिसरी आघाडी होऊ शकते का?

तिसरी आघाडी नाही पण पुन्हा एक बैठक होऊ शकते. कोण कोण एकत्र येतंय ? कशी समीकरणे जुळत आहेत. याबाबत एक बैठक होईल. 29 ऑगस्टला तशी काही घोषणा होणार नाही, लढायचं की पाडायचं एवढेच होईल आणि कामाला लागणार. सगळे गोरगरीब अपक्ष लढणार,सगळ्या जाती-धर्माचे लोक उभा राहणार.खचाखच पाडणार, असे जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT