Manoj Jarange Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange:...तर मराठा समाजाची फसवणूक होईल; प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज जरांगेंचे उत्तर

Manoj Jarange On Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण न घेण्याचा सल्ला दिला. त्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विनोद जिरे

Manoj Jarange News:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत उपोषण करण्याची हाक दिली आहे. दुसरीकडे जरांगे यांच्या ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण न घेण्याचा सल्ला दिला. त्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

प्रकाश आंबेडकरांनी काल रविवारी ओबीसी महामेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात प्रकाश आंबडेकरांनी ओबीसी मंचावर येण्याची ही माझी पाहिली वेळ नाही, ओबीसी चळवळच आम्ही सुरू केली आहे, असं म्हटलं. तसेच ओबीसीतून आरक्षण न मागता मराठा समाजाने आरक्षणाचं वेगळे ताट घ्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांना काय उत्तर दिलं?

प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरील वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. 'आम्ही ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी ठाम आहोत. जर वेगळ आरक्षण मागितलं तर मराठा समाजाची फसवणूक होईल. त्यामुळे आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज सोमवारी मनोज जरांगे बीडच्या दौऱ्यावर आहेत. बीडमधील चकलंबा गावात जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT