Maratha Reservation  Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम; मराठा आरक्षण विधेयक मंजूर तरीही रागाने हातावरची सलाईन काढली!

Manoj Jarange Patil : राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.

Sandeep Gawade

Maharashtra Legislature Session

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाइन काढली. आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं. उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विधानसभेत 'सगेसोयरे'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहे.

जवळपास चार महिने सुरू असलेल्या मराठा आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी सरसरट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी प्रवाणपत्र दिलं तर सर्व मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येईल, असं जरांगेंचं म्हणणं आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र आजच्या अधिवशेनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेंबाबत कोणताच ठराव केला नाही, त्यामुळे जरांगें पुन्हा आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारने आज, मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडलं. मराठा आरक्षणासाठीच्या विधेयकाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. आता हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात येईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे स्वाक्षरीकरिता पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे. आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे.

ओबीसी बांधव असो, किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक, आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे.", असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नेस्को ड्रग्स प्रकरणात आणखी एकाला अटक

पुण्यात थरार! भिडे पुलाजवळ तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं कारण काय ?

खरातशी एकनाथ शिंदेंचं थेट कनेक्शन; राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच कारवाईचे आदेश, श्याम मानव यांचा आरोप

Terror Alert : मोठी बातमी! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याचा कट; महाराष्ट्र कनेक्शन उघड, ३ राज्यांतून चौघांना बेड्या

High Blood Pressure : BP कंट्रोल करण्यासाठी लाइफस्टाइमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, औषधांची गरजही भासणार नाही

SCROLL FOR NEXT