

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता मराठा समाजाला नोकरीत तसेच शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होत असतानाच ओबीसी नेते छगन भुजबळ हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरुन शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चाललीय, त्याला अटकाव करणार आहे की नाही. एसपी, अधिकाऱ्यांना भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे. ते म्हणतात हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, अशी दादागिरी चालणार नाही.. असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
यावेळी छगन भुजबळ यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बोलण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार दिल्याने भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तुमच्या चिंतेंबाबत मी नोंद घेतली आहे, सरकारनं उचित उपाययोजना करावी, असेही विधानसभा अध्यक्ष यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी मात्र पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विधानसभेत 'सगेसोयरे'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नसल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.