Mohan Bhagwat Speech : २२ जानेवारीला संपूर्ण हिंदू समाज एकत्र दिसला : मोहन भागवत

Mohan Bhagwat on Hindu Samaj : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे देखील उपस्थित होते.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSaam TV

Latur News :

हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण हिंदू समाज दिवसभर एकत्र दिसला, असं सांगतानाच संपूर्ण देश एकत्र व्हावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लातूर येथील विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशलिटी विस्तारित रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे देखील उपस्थित होते. (Latest Marathi News)

Mohan Bhagwat
Satara Politics: साताऱ्याचं राजकारण पुन्हा तापलं! रामराजेंचा खासदार रणजितसिंह निंबाळकरांना खोचक टोला, म्हणाले; छोटा राजन...

हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आहे. मात्र जातीपातीचा मुद्दा पुढे येतोच. अनेक गोष्टी समोर येतात. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणतात की किती दिवस तेच तेच करायचं. हिंदू समाजाला एकत्र करणे म्हणजे कुत्र्याचं शेपूट सरळ करण्यासारखं आहे, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

Mohan Bhagwat
Rahul Gandhi News : राहुल गांधींना मोठा दिलासा! मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर; काय आहे ६ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसाचा दाखला देत मोहन भागवत म्हणाले की, २२ जानेवारी रोज हिंदू समाज सकाळपासून रात्रीपर्यंत एकत्र होता. देशातील जनतेच्या मनातील ती भावना आहे. संपूर्ण देश एकत्र व्हावा ही अपेक्षा आहे. आपल्या इथ पूजा-पाठ सगळं वेगवेगळं आहे. खूप परिवर्तन झालं आहे. मात्र अजून खूप काही बाकी आहे, हळूहळू संगळं होईल, असंही मोहन भागवत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com