

भूषण अहिरे
धुळे तालुका पोलिसांनी चित्तोड गाव परिसरातील दुचाकी चोरी उघडकीस आणून मोहाडी परिसरातून एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण दहा चोरीच्या दुचाकी धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गोपाल देविदास पाटील (वय 38) असे ताब्यात घेतलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी चित्तोड गाव परिसरातून महेंद्र मोहन बोरसे (वय 35) यांची मोटरसायकल चोरी गेली होती. त्याची तक्रार देखील तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा समांतर तपास करत असताना धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपासाची चक्र फिरवली.
गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी परिसरात राहणाऱ्या गोपाल देविदास पाटील वय 38 याला चोरीच्या दहा मोटरसायकलीसह तब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत अजून एका चोरट्याचे नाव समोर आले आहे. त्याचा देखील तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकांत धीवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
या कारवाईत तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
घरफोडी करणाऱ्या टोळीतील ५ जणांना अटक
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीला पकडण्यात नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी पाच कुख्यात आरोपींना अटक केलीये. सुमारे चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. राहुल माणिकपुरी असं मुख्य आरोपीचं नाव आहेय.
ही टोळी घरफोडी करताना जे समान हातात लागेल त्याची चोरी करत होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत ते साहित्य विकून पैस आपवसात वाटून घेत होते. त्यांनी रामटेक, कामठी, जरीपटका तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सेलू, या भागातही चोरी केल्याचं तपासात समोर आलंय. यात दुचाकी टीव्ही संच, सिलेंडर, दागिने कपडे आदी साहित्य पोलिसांनी जप्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.