Maratha leader Manoj Jarange Patil addressing thousands at the Dussehra Melava saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के मदत करा, जरांगेंच्या ४ मागण्या

Manoj Jarange Patil Demand For Farmers: नारायण गड येथील दसरा मेळाव्यात मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी ४ प्रमुख मागण्या केल्या. यात दुष्काळ जाहीर करणे आणि तात्काळ सरकारी मदत यांचा समावेश होता.

Bharat Jadhav

  • मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यात ४ मोठ्या मागण्या केल्या.

  • शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.

  • नारायण गडावर झालेल्या मेळाव्याला हजारो मराठा बांधव उपस्थित.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. शेतातील पिकं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात केलीय.

मनोज जरांगे यांनी आज नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. या दसरा मेळाव्याला हजारो मराठा बांधवांना हजेरी लावली. आपल्या या भाषणात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अनेक महत्त्वाचे संदेश दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी चार मोठ्या मागण्या केल्या आहेत. गड नगद आहे म्हणून ताकद मिळते, मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी, असेही जरांगे पाटील म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या

मराठवाडा आणि आजूबाजूच्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा.

दिवाळीच्या आधी सरसकट मदत करावी. ज्यांची शेतं वाहून गेली नाही, शेतात पाणी आहे, त्यांना ७० हजार मदत करावी.

ज्याच्या नदीच्या शेजारची शेत वाहून गेली आहेत अन् पिकपण वाहून गेली, त्यांना एक लाख ३० हजार भरपाई द्या.

ज्याची जनावरे, धान्य वाहून गेले, घर पडलं, पिके वाहून गेले. त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करा, जेवढं वाहून गेले, तेवढी १०० टक्के मदत करा. शेतकऱ्यांचे ऊसाचे १५ रूपये कापायचे ठरवले. एक रूपयाही कापायचा नाही. त्याला पर्याय ज्याला १० पगार आहे, त्याचे अडीच हजार कापा. ज्याला २० हजार पगार आहे, त्याचे ५ हजार कापा. नोकरदाराचे पैसे कापा अन् शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

एका एका पक्षाकडे एक एक हजार लोकं आहेत. आता सरकारला रोग आलाय का? व्यावसायिक, खासदार, आमदार, उद्योगपती यांच्याकडे संपत्ती खूप आहे. शेतकऱ्यांचे पैसे कशाला कापतात. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिंदे यांचाही पगार कापा. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह नेत्यांचे पैसे कापावे. अंबानीने पेट्रोल पंपाचे एक दिवसाचे पैसे द्यावेत. राणेंकडेचेही पैसे घ्यावे. विखे, मोहिते, चव्हाण, देशमुख, छगन भुजबळ यांच्याकडचे पैसे घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला पोहोचले

IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

SCROLL FOR NEXT